Akshay Sabale
जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी ) पक्षाचे नेते, अनुरा कुमार दिसानायके यांचा ज्न्म श्रीलंकेची राजधानी कोलोंबोपासून दूर असलेल्या थंबुट्टेगामा गावातील कामगार कुटुंबात झाला.
आपल्या गावातून विद्यापीठात शिक्षण घेणारे दिसानायके हे पहिले विद्यार्थी होते.
सन 1995 मध्ये सोशलिस्ट स्टूडेंट्स एसोसिएशनचे राष्ट्रीय आयोजक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची देशपातळीवर सुरुवात केली.
जेवीपीच्या केंद्रीय कार्य समितीमध्ये त्यांना स्थान मिळाले. सन 2000 मध्ये दिसानायके पहिल्यांदाच खासदार बनून श्रीलंकेच्या संसदेत पोहोचले.
सन 2004 मध्ये श्रीलंका फ्रीडम पार्टीसोबत आघाडीत सत्तेत आल्यानंतर त्यांना कृषी आणि जलसिंचन मंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला होता.
1 वर्षातच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सातत्याने मार्क्सवादी विचारधारेला त्यांनी प्रोत्साहन दिले, तोच विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं.
विद्यार्थी आणि कामगार हे दोन मुद्दे प्रामुख्याने त्यांच्या अजेंड्यावर आणि भाषणातही दिसून येतात.