Sumit Wankhede : फडणवीसांचे विश्वासू आमदारकीच्या वाटेवर; जाणून घ्या, सुमित वानखेडे यांच्याविषयी...

Rashmi Mane

सुमित वानखेडे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे सात वर्षांपूर्वी फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना सुमित वानखेडे यांची खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Sumit Wankhede | Sarkarnama

स्वीय सहायक

मुलाखतींद्वारे स्वीय सहायक म्हणून निवड करण्यात आली होती.

Sumit Wankhede | Sarkarnama

मुंबई

फडणवीस मुख्यमंत्री होताच ते सुमित वानखेडे यांना मुंबईत घेऊन आले.

Sumit Wankhede | Sarkarnama

मूळचे विदर्भाचे

वानखेडे मूळचे विदर्भातील वर्धा जिल्ह्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघातील आहेत.

Sumit Wankhede | Sarkarnama

इच्छुक उमेदवार

२०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत अचानक त्यांचे नाव इच्छुक उमेदवारांच्या यादीत झळकले होते.

Sumit Wankhede | Sarkarnama

 आर्वीमध्ये मोर्चेबांधणी

भाजपचे सुमित वानखेडे वर्धा लोकसभा मतदारसंघासह आर्वीत भाजपला जनतेच्या मनामनांत नेण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

Sumit Wankhede | Sarkarnama

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी

सुमित वानखेडे यांच्याकडं पक्षानं वर्धा लोकसभा मतदारसंघाचं प्रभारी पद सोपवलं आहे. जूनमध्ये लोकसभा प्रभारी झाल्यापासून वानखेडे हे झोकून देत पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

Sumit Wankhede | Sarkarnama

वानखेडेंचे विशेष लक्ष

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपला अधिकची बळकटी मिळवण्यासाठी वानखेडे यांनी विशेष लक्ष दिले आहे.

Sumit Wankhede | Sarkarnama

Next : अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणाच्या रिंगणात?

येथे क्लिक करा