चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत असलेली 'ती' खास व्यक्ती कोण?

Roshan More

ब्रिक्स

दिल्लीत पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेसाठी चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिपिंग हे उपस्थित होते.

PM Modi | sarkarnama

'ती' व्यक्ती सोबत

चीन राष्ट्रध्यक्षांसोबत असलेल्या एका खास व्यक्तीची माध्यांमामध्ये चर्चा आहे.

Sun Ning Xi Jinping | sarkarnama

सन निंग

त्या व्यक्तीचे नाव सन निंग असे आहे. ती दुभाषी म्हणून चीनच्या राष्ट्रध्यक्षांसोबत आहे.

Sun Ning Xi Jinping | sarkarnama

अध्यक्ष जिनपिंग यांचे विश्वासू

२०१२ मध्ये शी जिनपिंग अमेरिका दौऱ्यावर गेले असताना सन निंग त्यांच्यासोबत होते.

Sun Ning Xi Jinping | sarkarnama

प्रत्येक दौऱ्यात सोबत

२०१३ मध्ये शी जिनपिंग अध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात आणि बैठकांमध्ये सन निंग मुख्य दुभाषी म्हणून काम पाहतात.

Xi Jinping | sarkarnama

शिक्षण

सन निंग यांचे शिक्षण 'नानजिंग फॉरेन लँग्वेज स्कूल' आणि 'बीजिंग फॉरेन स्टडीज युनिव्हर्सिटी'मधून झाले.त्यांनी इंग्रजी भाषेत पदवी घेतली, तसेच त्यांनी ब्रिटनमध्येही उच्च शिक्षण घेतले आहे

Sun Ning | sarkarnama

विदेश मंत्रालयातील प्रवेश

कॉलेजमध्ये असताना त्यांच्या इंग्रजी वक्तृत्व आणि भाषेवरील प्रभुत्वामुळे ऑगस्ट २००३ मध्ये चीनच्या विदेश मंत्रालयाने पदवी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची अनुवाद विभागात निवड केली

Sun Ning Xi Jinping | sarkarnama

NEXT : मोदींनी पुतीन यांना भेट दिलं ऐतिहासिक तमिळ पुस्तक; रशियाशी आहे कनेक्शन

Brics Summit
येथे क्लिक करा