Bhidewada News : मुलींच्या शाळेसाठी फुले दाम्पत्यांना 'भिडेवाडा' देणारे तात्यासाहेब भिडे कोण ?

Chetan Zadpe

मुलींची पहिली शाळा -

देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील बुधवार पेठेतल्या भिडेवाड्यात फुले दाम्पत्यांनी सुरु झाली.

Bhidewada News | Sarkarnama

शंकर रामचंद्र भिडे (तात्यासाहेब भिडे) -

पुणे विद्यापीठ येथील इतिहासाच्या प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, शंकर रामचंद्र भिडे (तात्यासाहेब) यांनी फुल्यांना ही जागा शाळेसाठी दिली.

Bhidewada News | Sarkarnama

पेशाने सावकार -

भिडे पेशाने सावकार होते. पेशवाईच्या पाडावानंतर राजाश्रय मिळण्यासाठी ते पटवर्धनांकडे गेले आणि तिथे कामाला लागले. त्यांना दोन पत्नी होत्या.

Bhidewada News | Sarkarnama

उदारमतवादी भिडे -

समाजाचा विरोध डावलून त्यावेळी तात्यासाहेब भिडे यांनी फुल्यांना जागा दिली. कारण ते विचारांनी आधुनिक आणि उदारमतवादी होते. 

Bhidewada News | Sarkarnama

फुल्यांचे चांगले स्नेही -

महात्ना जोतिबा फुले आणि तात्यासाहेब भिडे यांच्यात चांगली मित्रत्व होते. फुल्यांचे ते स्नेही होते.

भिडेंची मदत -

मुलीसांठी शाळा सुरू होणार ही अभिनव कल्पना भिडेंना आवडली!

Bhidewada News | Sarkarnama

भिडेंनी देणगीही दिली -

मुलींच्या शाळेसाठी जागा तर दिलीच, जागेसोबतच त्यांनी 101 रुपयांची देणगीही दिली. त्यावेळी ही रक्कम फार मोठी होती.

Bhidewada News | Sarkarnama

NEXT : आघाडीचा महाराष्ट्रातील जागावाटपाचा फॉर्म्युला तयार!

येथे क्लिक करा..