सरकारनामा ब्यूरो
महाकुंभमेळ्यात असणाऱ्या आखाड्याचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांत असते. तर ते कसे? हे जाणून घ्या.
शेकडो वर्षांपासूनची परंपरा म्हणून अनेक भाविक या आखाड्यांना सोने, चांदी, रोख रक्कम, जमीन, घर अशा वस्तू दान देतात. पूर्वी राजे आणि श्रीमंत व्यापारी देखील मोठ्या देणग्या देत होते.
आखाड्यांकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. आणि हे उत्पन्न फक्त भक्तांच्या दानातूनचं नाही, तर त्यांच्या मालमत्ता आणि धार्मिक कार्यांतूनही मिळते.
भारतातील अनेक प्रमुख मंदिरे हे मोठे आखाडे चालवत असतात. या मंदिरांमध्ये दररोज हजारो भाविक येतात जे दान करतात. त्यामुळे या आखाड्यांची करोडो रुपयांची कमाई होते. यातून हे आखाडे शैक्षणिक संस्था चालवतात.
महाकुंभमेळ्यातील या आखाड्यांना कार्यक्रमांच्या वेळी, राज्य सरकारं आर्थिक मदत करतात, जेणेकरून या कार्यक्रमाची तयारी आणि धार्मिक उपक्रम कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडली जावेत.
अनेक आखाड्यांकडे मोठ्या शहरांमध्ये आणि तीर्थक्षेत्रांमध्ये जमिनी आहेत. या जमिनी भाड्याने देऊनही ते यातून करोडो रुपये कमावतात.
भारतात एकूण 13 आखाडे आहेत त्यापैकी काहींची मालमत्ता हजारो कोटी रुपयांची असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
13 आखाड्यापैकी निरंजनी आखाडा हा संपूर्ण देशातील सर्वात श्रीमंत आखाडा मानला जातो. याची संपत्ती जवळजवळ 1000 कोटी रुपये इतकी आहे. या आखाड्याचे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन, वाराणसी, नोएडा, जयपूर, वडोदरा येथे मठ आहेत.