Chaitanya Machale
फ्रेंच महिला फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांच्या संपत्तीने 100 अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला आहे.
ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार, फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स या जगातील सर्वात मोठी सौंदर्यप्रसाधने कंपनी लॉरियलच्या वारसदार आहेत.
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेले उद्योगपती मुकेश अंबानी हे देखील मायर्स यांच्या मागे आहेत.
मायर्स आणि त्याच्या कुटुंबाकडे लॉरिअलमधील 34 टक्के हिस्सा आहे. यंदाच्या वर्षी त्यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झालेली आहे.
मायर्स यांची आई लिलियन बेटनकोर्ट देखील 2017 पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत महिला होत्या. 2017 मध्ये त्यांच्या आईचे निधन झाले
फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स यांचे पती जीन पियरे मायर्स हे कंपनीचे सीईओ आहेत
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्या 12 व्या क्रमांकावर आहेत. आजपर्यंत जगातील कोणतीही महिला 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती निर्माण करु शकलेली नाही.
त्यांना दोन मुले असून जीन व्हिक्टर मेयर्स आणि निकोलस मेयर्स हे देखील त्यांच्या कंपनीत संचालक आहेत.
कोरोनाची लाट संपल्यानंतर लक्झरी कॉस्मेटिक्स उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे त्यांची संपत्तीत देखील वाढ झाली आहे.