Jagdish Patil
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी घडली.
या घटनेनंतर संबंधित महिला फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत कशी पोहोचली? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
या घटनेवरून विरोधकांनी मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
महिलेने असं का केलं, तिची काय व्यथा आहे? हे समजून घेऊ तसेच तिला कोणी पाठवलं का याचीही चौकशी करू असं फडणवीस म्हणाले.
तपासात मंत्रालयात गोंधळ घालणाऱ्या महिले संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे
फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव धनश्री सहस्त्रबुद्धे असं आहे.
ही महिला मानसिक रुग्ण असून ती दादरमधील एका सोसायटीत राहते. तिने सोसायटीमधील लोकांना त्रास दिल्याचंही उघड झालं आहे.
या महिलेने याआधी भाजपच्या कार्यालयातही गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी देखील ही महिला अनेकवेळा मंत्रालयात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.