उपोषणाला बसलेल्या बच्चू कडूंच्या मागे मोठी ताकद; 'तुकाराम दादा' कोण आहेत ?

सरकारनामा ब्युरो

शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

Bacchu Kadu | Sarkarnama

4 दिवसांपासून गुरुकुंज मोझरी येथे सुरु असलेल्या उपोषणाला विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे.

Bacchu Kadu, Nilesh Lanke | Sarkarnama

राजकीय पक्षांशिवाय बच्चू कडू यांच्या मागे आणखी एक ताकद आहे. ती ताकद आहे गीताचार्य तुकाराम दादा यांची.

Bacchu Kadu | Sarkarnama

आंदोलनस्थळी व्यासपीठावरच बच्चू कडू यांच्या मागे तुकाराम दादा यांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे.

Bacchu Kadu | Sarkarnama

तुकाराम दादा हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शिष्य होते. त्यांनी स्थापन केलेल्या गुरुदेव सेवा मंडळाचे ते आजन्म प्रचारक होते.

Tukaram Maharaj | Sarkarnama

तुकाराम दादांनी अखंड भारत भ्रमण करून सर्व राज्यांमध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या जवळपास 40 हजार शाखा स्थापन केल्या.

Tukaram Maharaj | Sarkarnama

तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील तत्वाप्रमाणे गाव-खेड्याचा विकास करण्यासाठी त्यांचे योगदान होते.

Tukaram Maharaj | Sarkarnama

गावातील अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जाती-धर्मातील भेद मिटविण्यासाठी तुकाराम दादा यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

Tukaram Maharaj | Sarkarnama

महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांचे शोषण, राजकीय भ्रष्टाचार, तरुणांमधील व्यसनाधिनता संपण्यासाठी त्यांनी काम केले.

Tukaram Maharaj | Sarkarnama

ग्रामसभेला सक्षम करण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या टास्क फोर्स समित्यांचे ते सदस्य होते.

Tukaram Maharaj | Sarkarnama

चंद्रपूर जिल्ह्यातील अढ्याळ टेकडी येथे तुकाराम दादांनी जवळपास 12 वर्ष मौन राहुन ग्रामगीतेची साधना केली.

Tukaram Maharaj | Sarkarnama

Panchayat Season 4 trailer : पंचायतमध्ये यंदा निवडणुकीचा धुरळा : चौथ्या सिझनचा ट्रेलर पाहिलात का?

Panchayat Season 4 trailer | Sarkarnama
येथे क्लिक करा