Deepak Kulkarni
राज्य सरकारकडून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) पोलीस अधीक्षक वैशाली माने यांची नुकतीच झालेली बदली रद्द केल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
माने यांची काही दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये मिरा-भाईंदर येथे पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) पोलीस अधीक्षक वैशाली माने यांची नुकतीच करण्यात आलेली बदली राज्य सरकारने रद्द केली आहे. गृह विभागाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला असून त्यांचं नवं पोस्टिंग वेटिंगवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी असलेल्या वैशाली माने यांनी पोलिस दलात खळबळ उडवून देणारे गंभीर आरोप केले होते.
सीआयडी अधिकारी वैशाली माने यांनी पोलिस दलात महिला अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक,निर्णयप्रक्रियेत डावलले जाते आणि बदल्यांमध्ये साईडपोस्टिंग देत दुजाभाव केला जातो, असे काही गंभीर आरोप केले होते. सरकारने त्यांच्या आरोपांची दखल घेतली आहे.
वैशाली माने या महाराष्ट्र पोलिस दलातील एक कर्तव्यदक्ष आणि धडाडीच्या पोलीस अधिकारी आहेत.
त्यांच्या बेधडक कारवाया तसेच गुन्हेगारांमधील भीतीमुळे त्यांना 'लेडी सिंघम' म्हणूनही ओळखले जाते.
माने या मूळ सातारा जिल्ह्यातील मानेवाडी येथील आहे. त्यांनी कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण केले असून सातारा व पुणे येथे वकिलीही केली आहे. 2009 मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची 'डीवायएसपी' पदी निवड झाली होती.