Roshan More
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली.
उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद जगदाळे यांना देत दौंड तालुक्याला नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे.
जगदाळे यांनी यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवता विजयाची हॅटट्रिक केली.
वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते मानले जात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक इच्छुक असताना जगदाळेंवर सुनेत्रा पवार यांनी विश्वास दाखवला.
दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याच्या व्यवस्थापनात देखील जगदाळे सक्रीय आहेत.
वीरधवल यांचे वडील कृष्णराव जगदाळे हे दौंडचे माजी आमदार होते. त्यामुळे वीरधवल यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला.