Vivek Kolhe : नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे कोण आहेत?

Jagdish Patil

सहकारी आणि शैक्षणिक संस्थेवर छापेमारी

विवेक कोल्हे यांच्या सहकारी आणि शैक्षणिक संस्थेवर राज्य सरकारच्या शिक्षण विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापेमारी केली.

Vivek Kolhe | Sarkarnama

'प्रवृती'ला बळ

छापेमारीनंतर CM एकनाथ शिंदे सरकारी यंत्रणांचा वापर करून 'प्रवृती'ला बळ देत असल्याचा आरोप कोल्हेंनी केला.

Vivek Kolhe | Sarkarnama

विवेक कोल्हे कोण आहेत?

छापेमारीनंतर चर्चेत असणारे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे कोण आहेत जाणून घेऊया.

Vivek Kolhe | Sarkarnama

बिपीन कोल्हे यांचे चिरंजीव

विवेक हे कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांचे चिरंजीव, तर माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव यांचे ते नातू आहेत.

Vivek Kolhe | Sarkarnama

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण

त्यांचे माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. नाशिक येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

Vivek Kolhe | Sarkarnama

औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष

कोपरगावच्या ग्रामीण भागात पहिले कॉलसेंटर सुरू केले. ते कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आहेत.

Vivek Kolhe | Sarkarnama

युवा नेतृत्त्व

अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्टचे आणि मिल्कचेही ते संचालक आहेत. कोपरगाव तालुक्‍यातील युवा नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं

Vivek Kolhe | Sarkarnama

बाळासाहेब थोरात यांच्याशी चांगले संबंध

भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे व काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचे चांगले संबंध असल्याचं बोललं जातं.

Vivek Kolhe | Sarkarnama

NEXT : खासदारकीची हॅटट्रिक, मोदींच्या मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा संधी; शोभा करंदलाजे कोण?

Shobha karandlaje | sarkarnama