Roshan More
चौधरी झुल्फिकार अली हे जम्मू-काश्मीरच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) सरकारमध्ये मंत्रीही होते.
झुल्फिकार अली यांनी जम्मू काश्मीर सरकारमध्ये शिक्षण मंत्री, अन्न पुरवठा मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम पाहिले आहे.
झुल्फिकार अली हे कट्टरवादी नेता म्हणून ओळखले जात होते. जम्मू कश्मीरच्या विशेष दर्जाचे समर्थन करत होते.
झुल्फिकार अली हे पेशाने वकील होते. 2015 ते 2018 पर्यंत ते मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी-भाजप युती सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री होते. 2018 मध्ये भाजपने पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडले.
झुल्फिकार अली यांनी 2020 मध्ये माजी मंत्री अल्ताफ बुखारी यांच्यासोबत जेकेएपी पक्षाची स्थापना केली.
झुल्फिकार अली यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांची भेटली घेतली होती.
झुल्फिकार अली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते आता भाजपसोबत काम करणार आहेत.