सरकारनामा ब्यूरो
जगभरात 8 मार्चला महिला दिवस साजरा केला जातो. याच दिनानिमित्त आपण जाणून घेऊयात, भारतातील पहिल्या महिला IAS अधिकारी अधिकाऱ्यांविषयी.
भारतातील पहिल्या महिला IAS अधिकारी आहेत अॅना राजम मल्होत्रा. त्या 1951 बॅचच्या देशातील पहिल्या महिला IAS अधिकारी आहेत.
इतिहासात नोंद झालेल्या मल्होत्रा यांचा जन्म 17 जुलै 1924 ला केरळातील एर्नाकुलम जिल्ह्यात झाला होता
कोझिकोड येथून प्राथमिक शिक्षण घेतले यानंतर त्यांनी चेन्नईतील मद्रास विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आणि पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी 1951 ला त्या भारतीय नागरी सेवेत (IAS) रुजू झाल्या आणि त्यांनी मद्रास केडर मिळवले.
IAS झाल्यानंतर त्यांनी देशाचे दोन पंतप्रधान आणि सात मुख्यमंत्र्यांसोबत काम केले. यामध्ये इंदिरा गांधी,राजीव गांधी यांचाही समावेश होता.
देशसेवेसाठी त्यांना 1989 मध्ये 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निवृत्त झाल्यानंतर प्रसिद्ध हॉटेल लीला व्हेंचर लिमिटेडच्या संचालकपदाचा कार्यभार सांभाळला.
अॅना मल्होत्रा यांचे 2018 ला वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.