Rashmi Mane
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री म्हणून पहिली महापूजा करणारे व्यक्ती कोण माहितीये?
पंढरपूरमधील विठ्ठलाची शासकीय महापूजेची परंपरा 1963 पासून सुरु झाली.
1970 आणि 1971 आणि 1972 साली महापूजा झाली नाही. कारण 72 ला महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला होता.
1963 मध्ये मारोतराव कन्नमवार यांनी मुख्यमंत्री पदावर असताना विठ्ठल मंदिरात प्रथमच महापूजेचा मान स्वीकारला.
विठ्ठल मंदिर समितीच्या नोंदीनुसार, पहिल्यांदा 1963 मध्ये कन्नमवारांना महापूजेचा मान मिळाला होता.
त्यांच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेसाठी उपस्थित राहण्याची प्रथा पडली आणि आजही ती निरंतर चालू आहे.
मारोतराव कन्नमवार हे विदर्भातील लोकप्रिय नेते होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रगतीशील निर्णय घेतले.
कुडुवाडी येथील 'सकाळ' प्रतिनिधीच्या माहितीनुसार, त्या काळात प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्राच्या बातमीनुसार, एकादशीच्या दिवशी पहाटे कन्नमवार यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा पार पडली होती.