Ganesh Sonawane
दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधात सदनिका घोटाळा प्रकरणात तक्रार दिली होती.
दिघोळे यांच्या तक्रारीनुसार कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आज तीस वर्षांनी नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटेंना दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.
माजी मंत्री तथा सिन्नरचे माजी आमदार तुकाराम सखाराम दिघोळे याचे वयाच्या 77 व्या वर्षी २०१९ मध्ये निधन झाले.
सिन्नर तालुक्यातील जायगाव येथली ते भूमिपुत्र होते. सिन्नर तालुक्याच्या राजकारणात त्यांचे अढळ स्थान होते.
1985 ते 1999 पर्यंत सलग 15 वर्ष ते सिन्नरचे आमदार राहीले.
युती शासनाच्या काळात 1995 ते 1999 या काळात उर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांनी मंत्रीपद भूषविले.
जिल्हा बँकेचे संचालक, उर्जा, ग्रामविकास मंत्री, राज्य सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पार पाडल्या.
शरद पवार यांच्या एस काँग्रेस, पुलोदच्या काळात ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग तीनवेळा ते सिन्नरचे आमदार होते.