Jagdish Patil
देशभरात आज 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातोय. 26 जानेवारी हा देशाच्या इतिहासातील विशेष दिवस आहे.
हा दिवस देशाच्या संविधानाची अंमलबजावणी आणि भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक घोषित केल्याचं प्रतिक आहे.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान 2 वर्षे 18 दिवसात तयार करण्यात आले, पण त्याची अंमलबजावणी 26 जानेवारीला का केली? ते जाणून घेऊया.
राष्ट्रीय काँग्रेसने 1929 मध्ये लाहोर अधिवेशनात घोषणा केली की, भारत अर्ध्या नव्हे तर संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करेल.
त्यानुसार 26 जानेवारी 1930 हा पूर्ण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी भारतीयांनी स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून तिरंगा फडकावला.
क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली.
26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू करून भारताने ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्याचा लढा पूर्ण केला. तेव्हापासून भारताचे नव्या युगाची सुरुवात झाली.
याच दिवशी संविधान सभेने देशातील जनतेला 1930 मध्ये पूर्ण स्वातंत्र्याच्या स्वप्नाची आठवण करून दिली.