सरकारनामा ब्यूरो
प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात बुधवारी मौनी अमवस्येनिमित्त येथे भाविकांनी स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
रात्री उशिरापर्यंत संगम नोज घाटावर प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले असून 10 हून अधिक जणांचा यात मृत्यू झाला आहे.
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीचे कारण काय आणि संगम नोज येथे एवढी गर्दी का होते जाणून घेऊयात...
प्रयागराज येथील संगम नोज घाट अत्यंत पवित्र मानला जातो. या ठिकाणी स्नान करण्यासाठी जगभरातील अनेक भक्त, साधू, संतांची गर्दी होत असते.
संगम नोज हे नाव या घाटाला त्याच्या आकारामुळे देण्यात आले आहे.
मौनी अमावस्याच्या दिवशी यमुना नदी आणि सरस्वती नदी गंगेला मिळतात. यामुळे या ठिकाणाला पवित्र मानून ऋषी-मुनी भाविक या स्नानाला खूप महत्त्व देतात.
2019 च्या तुलनेत यावेळी प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली यामुळे संगम नाक्याच्या परिसरात लोकांच्या सुरक्षिततेच्या अनुशंगाने वाढ करण्यात आली आहे.
संगम घाटावर 2019 मध्ये दर तासाला 50 हजार लोक स्नान करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यावेळी महाकुंभात दर तासाला 2 लाख लोक स्नान करत आहेत.