India Independence Day Special: ब्रिटीश सरकारनं भारतीय स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडली?

Deepak Kulkarni

स्वातंत्र्य दिन

संपूर्ण भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साह आणि अभिमानाने साजरा केला जातो.

India's Independence Day | Sarkarnama

त्याग,शौर्य,बलिदानाचं स्मरण

प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस इतिहासातील एक सुवर्ण पान आहे, जो आपल्या स्वातंत्र्य सेनानींच्या त्याग,शौर्य,बलिदानाचं मूल्य आणि महत्त्व यांचं स्मरण करुन देतो.

India's Independence Day | Sarkarrnama

स्वातंत्र्य दिनाबाबत माहिती

भारतात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो आणि त्याचा इतिहासाबाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

India's Independence Day | Sarkarnama

लाल किल्ल्यावर तिरंगा

15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला आणि त्यांच्या ऐतिहासिक भाषणानं भारताच्या एका नवीन युगाची सुरुवात होता.

India's Independence Day | Sarkarnama

माउंटबॅटन यांनी निवडली ही तारीख

भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅट यांनी ही तारीख निवडली होती. माउंटबॅटन यांनी ही तारीख निवडली कारण ती दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीचा दुसरा वर्धापन दिन होता.

India's Independence Day | Sarkarnama

मित्रराष्ट्रांचे कमांडर

जपानने मित्र राष्ट्रांसमोर 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागती पत्करली आणि त्यावेळी आग्नेय आशियातील मित्रराष्ट्रांचे कमांडर माउंटबॅटन होते. त्याचमुळे त्यांनी ही एक तारीख महत्त्वाची मानली.

India's Independence Day | Sarkarnama

ब्रिटिश सरकारचा निर्णय

माउंटबॅटन यांनी जून 1947ं ला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र होईल. ही तारीख निवडण्यात प्रशासकीय आणि राजकीय तयारीचाही समावेश होता. कारण ब्रिटिश सरकार शक्य तितक्या लवकर भारताला सत्ता हस्तांतरण करू इच्छित होते.

India's Independence Day | Sarkarnama

भारताला औपचारिकपणे स्वातंत्र्य

मोठ्या लढ्यानंतर 1947 मध्ये भारताचे भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशांमध्ये विभाजन झाले. 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारताला औपचारिकपणे स्वातंत्र्य मिळाले.

India's Independence Day | Sarkarnama

NEXT : पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या वैमानिकांचा सन्मान! ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या 'त्या' 9 जणांना 'वीर चक्र'!

Vir Chakra Award to Operation Sindoor | Sarkarnama
येथे क्लिक करा...