Ganesh Sonawane
भारतीय कायद्यानुसार आरोपीला पहाटे फाशी दिली जाते.
तसेच फाशी देण्याचे काही नियम आहेत. ज्यामध्ये अनेक गोष्टींचं पालन करावं लागतं.
जेल मॅन्युअलनुसार, सर्व काम सकाळी सूर्योदयानंतर केली जातात.
त्यामुळे फाशीची प्रक्रिया देखील सकाळी देण्याचं ठरवलं जातं.
ज्यामुळे इतर जेलमधील कामांवर त्याचा परिणाम होत नाही. इतर आरोपी त्यावेळी झोपलेले असतात.
एवढंच नाही तर आरोपीला फाशी देण्यापूर्वी त्याला फासी देणारा जल्लाद हा आरोपीच्या कानात काहीतरी सांगतो.
खरंतर तो आरोपीची माफी मागतो. तो म्हणतो, "मला माफ करा, मी फक्त हुक्माचं पालन करतोय. हे माझं कर्तव्य आहे. हिंदूंना राम-राम, मुस्लिमांना सलाम."
देशात गंभीर गुन्ह्यांसाठी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली जाते.