Vijaykumar Dudhale
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या प्रणिती शिंदे यांनी ‘सोलापूर शहर मध्य’च्या आमदारकीचा 19 जून रोजी राजीनामा दिला आहे.
पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी अजित पवार गटाच्या आमदारकीचा राजीनामा 10 एप्रिल रोजी देऊन नगर दक्षिणची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले आहेत
चंद्रपूरमधून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघाच 13 जून रोजी राजीनामा दिला.
संदीपान भुमरे
राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेले संदीपान भुमरे यांनी पैठण विधानसभा मतदारसंघाचा 14 जून रोजी राजीनामा दिला. ते छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेला विजयी झाले आहेत.
रवींद्र वायकर हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांनी जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचा ता. 14 जून रोजी राजीनामा दिला.
धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली, त्यामुळे त्यांनी ता. 18 जून रोजी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
बळवंत वानखेडे यांनी दर्यापूर मतदारसंघाच्या आमदारकीचा 12 जून रोजी राजीनामा देत अमरावतीमधून लोकसभा लढवली. त्यात ते विजयी झाले.
उमरेडमधून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झालेले राजू पारवे यांनी ता. 24 मार्च रोजी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचा रामटेकमधून पराभव झाला.