Rajanand More
डी. के. शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यानंतर सर्वाधिक ताकदीचे नेते.
काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळख. पक्षाच्या अडचणीच्या काळात अनेकदा धावून जात त्यांनी विविध राज्यांमधील पक्षाची सरकारे वाचविण्याचे काम केले आहे.
२००२ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारवर संकट आले होते. त्यावेळी शिवकुमार यांच्या प्लॅनिंगने पक्षाचे ४० आमदार बेंगलुरू येथील रिसॉर्टवर नेण्यात आले होते. त्यानंतर सरकार वाचले होते.
गुजरातमध्ये २०१७ मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवेळी पक्षाचे ४२ आमदार बेंगलुरू येथे नेण्यात आले होते. त्यावेळी अहमद पटेल विजयी झाले होते. आमदारांना एकत्रित ठेवण्याची जबाबदारी शिवकुमारांवर होती.
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती होती. यावेळी काँग्रेस आणि जेडीएसची आघाडी घडवून आणण्यात महत्वाची भूमिका.
एडीआर रिपोर्टनुसार कनकपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या शिवकुमार यांची सुमारे १४१३ कोटी एवढी संपत्ती आहे. देशातील सर्वाधित श्रीमंत आमदारांपैकी ते एक आहेत.
शिवकुमार हे सध्या मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. त्यासाठी समर्थक आमदारांकडून लॉबिंग सुरू आहे. या पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्यूला ठरला होता, असा दावा.
राज्यात काँग्रेसचे १४० आमदार आहेत. त्यापैकी अनेक आमदारांचा शिवकुमार यांना पाठिंबा असल्याचे मानले जाते.