Yashaswinee Raje Singh: उत्तर प्रदेशच्या भाजपच्या माजी आमदाराच्या मुलीची राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर का होतेय इतकी चर्चा?

Deepak Kulkarni

भाजपच्या माजी आमदाराची मुलगी

उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी आमदार विक्रम सिंह यांची कन्या यशस्विनी राजे सिंह ही सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

BJP Former MLA Daughter Yashaswinee Raje singh | Sarkarnama

अनेकदा वादात...

एक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर असलेली यशस्विनी राजे सिंह तिच्या सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. या पोस्टमधून अनेकदा वादही ओढवून घेत असते.

BJP Former MLA Daughter Yashaswinee Raje singh | Sarkarnama

आंदोलनाला समर्थन

एका भाजप नेत्याची मुलगी असूनही यशस्विनी राजे सिंह हिने दिल्लीतील जंतर मंतरवरील सीजेपीसह विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीरपणे समर्थन दिले.

BJP Former MLA Daughter Yashaswinee Raje singh | Sarkarnama

सरकारवर टीका...

तसेच या आंदोलनादरम्यान, जाहीरपणे ती अनेकदा मोदी सरकारवर जोरदार टीका करतानाही दिसली.

BJP Former MLA Daughter Yashaswinee Raje singh | Sarkarnama

नवीन शिक्षणमंत्र्यांवरही टीका

यात भर म्हणजे यशस्विनीने मोदी सरकारनं नियुक्त केलेल्या नवीन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांवरही खोचक टीका केली.

BJP Former MLA Daughter Yashaswinee Raje singh | Sarkarnama

धर्मेंद्र प्रधानांवरही हल्लाबोल

तसेच यशस्विनीने धर्मेंद्र प्रधानांवरही हल्लाबोल केला आहे. तिने राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी जी भाषा वापरली, त्यातून त्यांना आंदोलन, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या,पेपरफुटीचा कुठलाही पश्चाताप झाल्याचं दिसून आलं नसल्याची टीकाही केली आहे.

BJP Former MLA Daughter Yashaswinee Raje singh | Sarkarnama

यापूर्वी बीफ खाण्यावरुन वादात

यशस्विनी राजे सिंह हिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत खळबळ उडवून दिली होती. या पोस्टमध्ये स्पष्टपणे बीफ दिसत होते आणि तिने ती स्टोरी स्वतःच पोस्ट केली होती. यशस्विनी राजे सिंहने यावेळी बीफ हा तिचा आवडता पदार्थ असल्याचंही म्हटलं होतं.

BJP Former MLA Daughter Yashaswinee Raje singh | Sarkarnama

लाखो फॉलोअर्स

यशस्विनी ही एक डिजिटल क्रिएटर असून इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर 1,74,000 लोक तिला फॉलो करतात. ती अत्यंत सुंदर आहे आणि लोक तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात.

BJP Former MLA Daughter Yashaswinee Raje singh | Sarkarnama

NEXT: बिहारमधील 'अवैध' मंत्र्यासाठी आमदारकी सोडणारा भाजपचा वरिष्ठ नेता कोण?

Devesh kumar | Sarkarnama
येथे क्लिक करा...