El Nino : 'एल निनो' असूनही का कोसळतोय मुसळधार पाऊस? जाणून घ्या...

Rajanand More

एल निनो

यंदाच्या मान्सूनमध्ये भारतावर एल निनोचे सावट आहे. त्यामुळे यंदा पावसाची सुरूवातही विलंबाने झाली. पॅसिफिक महासागरातील पाणी असामान्यपणे गरम होण्याची प्रक्रिया म्हणजे, एल निनो. त्याचा परिणाम मान्सूनवर होण्याची भीती.

El Nino | Sarkarnama

अतिवृष्टी का?

एल निनोचे सावट असून मुंबईसह राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामागचे विज्ञान समजून घ्या.

Mumbai Rain | Sarkarnama

ग्लोबल वॉर्मिंग

जागतिक स्तरावर ग्लोबल वॉर्मिंगबाबत सातत्याने चर्चा होते. त्यामुळे सलग मध्यम पाऊस पडण्याऐवजी कमी वेळात ढगफुटीसदृश पाऊस पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

El Nino | Sarkarnama

पोषक स्थिती

तापमानवाढीमुळे वातावरणात अधिक बाष्प साठते आणि ते अचानक मुसळधार पावसाच्या स्वरूपात कोसळते. पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागरातील सध्याची स्थिती अशा पावसासाठी पोषक बनल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.

El Nino | Sarkarnama

मान्सूनला साथ

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा झाल्याने मान्सूनच्या ढगांना अधिक ऊर्जा मिळाली. या स्थितीला IOD म्हणतात.

Monsoon | Sarkarnama

IOD

हिंद महासागरातील पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल (IOD) स्थितीमुळे अरबी समुद्रात बाष्पीभवन वाढून मान्सून अधिक सक्रीय झाला आहे. त्यामुळे प्रामुख्याने मुंबई कमी कालावधीत अधिक पाऊस कोसळला.

Maharashtra Monsoon | Sarkarnama

एल निनोचा परिणाम कमी

पॉझिटिव्ह आयओडी आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या एकत्रित स्थितीमुळे एल निनोचा नकारात्मक प्रभाव सध्या कमी झाला आहे.

Monsoon in Maharashtra | Sarkarnama

पश्चिम घाटही कारणीभूत

शक्तिशाली बनलेले मान्सूनचे ढग म्हणजेच बाष्पयुक्त वारे पश्चिम घाटाला अडले गेले. त्यामुळेही मुंबईत अधिक पाऊस कोसळला.

Rain in Maharashtra

NEXT : राज्यपाल पदक पटकाविणाऱ्या IPS अधिकाऱ्याने दिला राजीनामा; केवळ 37 वर्षे वयाचे हे अधिकारी कोण?

येथे क्लिक करा.