Indian Defence Force Salute Style: भारतीय लष्कराच्या भूदल,हवाई दल अन् नौदल यांची 'सॅल्यूट'ची पध्दत वेगवेगळी का असते..?

Deepak Kulkarni

77 वा प्रजासत्ताक दिन

संपूर्ण देशभरात सोमवारी (ता.26) 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Indian Army Salute Style | Sarkarnama

शौर्याचं सर्वोत्तम सांघिक प्रदर्शन

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी आपली ताकद अन् शौर्याचं सर्वोत्तम सांघिक प्रदर्शन करण्यात आलं.

Indian Army Salute Style | Sarkarnama

कर्तव्यपथावरील परेड पाहण्यासाठी सहभागी

विविध देशातील प्रमुख पाहुणे तसेच देशभरातील अनेक मान्यवर या कर्तव्यपथावरील परेड पाहण्यासाठी सहभागी होत असतात. तसेच वृत्तवाहिन्यांवरही याचं प्रक्षेपण दाखवलं जातं.

Indian Army Salute Style | Sarkarnama

सॅल्यूट करण्याची पध्दत

भारतीय सैन्यदलाच्या भूदल (Army),हवाई दल (Air Force) अन् नौदल (Navy) यांचे सॅल्यूट करण्याची पध्दत वेगवेगळी का आहे ?

Indian Army Salute Style | Sarkarnama

सॅल्यूट करण्यापाठीमागंची कारणं

भारतीय सैन्यदल हे जगातील सर्वोत्तम सैन्यदलांपैकी एक समजलं जातं. पण आपल्या तीनही दलाच्या जवानांची सॅल्यूट करण्यापाठीमागं ऐतिहासिक व धोरणात्मक कारणं सांगण्यात येतात.

Indian Army Salute Style | Sarkarnama

नौदलाची सॅल्यूट करण्याची पद्धत निराळी

नौदलाच्या जवानांची सॅल्यूट करण्याची पद्धत थोडी निराळी आहे. तळहात जमिनीकडे वाकवत सॅल्यूट करण्यात येतो. या पद्धतीत तळहात समोरून दिसत नाही. पूर्वी युध्द नौकांवर ड्युटी निभावत असताना मळलेला किंवा तेलकट हात वरिष्ठांना दाखवून सॅल्यूट करणं बैशिस्तपणा व अनादरपूर्वक कृती समजली जात असत.

Indian Army Salute Style | Sarkarnama

आकाशात झेपावणाऱ्या विमानाप्रमाणे

भारताचे सर्वात प्रगत दल म्हणून जगभरात भारतीय वायुदलाचा नावलौकिक आहे. भारतीय वायुदलाच्या स्थापनेपासून ते 2006 पर्यंत भारतीय सैन्याप्रमाणेच सॅल्युट केला जात होता. पण 2006 मध्ये सॅल्युटमध्ये बदल करण्यात आला. तळव्याची ही स्थिती 45 अंश कोनात असतो. हाताच्या तळव्याची स्थिती ही आकाशात झेपावणाऱ्या विमानाप्रमाणे दिसते. हे वायुसेनेच्या कार्याचं प्रतीक मानलं जातं.

Indian Army Salute Style | Sarkarnama

भारतीय लष्कर जवान

भारतीय लष्कराच्या जवानांकडून संपूर्ण पंजा समोर उघडा ठेवून सॅल्यूट केले जातात. बोटे आणि अंगठा एकमेकांना जोडलेले असून मध्य बोट कपाळाला लागलेले असते. याचा अर्थ ज्या कुणा अधिकाऱ्यांना सॅल्यूट केला जातोय ,त्यांच्याप्रती पारदर्शकता, आदर आणि विश्वास व्यक्त करणे हा अर्थ असतो.

Indian Army Salute Style | Sarkarnama

NEXT: FASTag चे नियम बदलले? तुमच्याकडे 7-सीटर गाडी आहे का? मग 'ही' अपडेट नक्की वाचा!

येथे क्लिक करा...