सरकारनामा ब्यूरो
AIBE परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय बार (AIBE)परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत असतात तर, काय आहे ही परीक्षा जाणून घेऊया...
गेल्या आठवड्यातच, बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) 19 व्या अखिल भारतीय बार परीक्षेची अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली.
ऑल इंडिया बार (AIBE) परीक्षेला तेच विद्यार्थी बसू शकतात ज्यांनी भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेली आहे.
अखिल भारतीय बार परीक्षा ही एक पोस्ट-एनरोलमेंट परीक्षा आहे जी बार कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे भारतात कायद्याचा सराव करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते.
ही बहुपर्यायी परीक्षा असून साडेतीन तासांची असते.
या परीक्षेत विद्यार्थ्यांना भारतीय दंडसंहिता, सायबर कायदा,दिवाणी कायदा, फौजदारी कायदा, प्रशासकीय कायदा अशा अनेक इत्यादी कायद्याच्या विषयांशी निगडीत प्रश्न विचारले जातात.
राज्य बार कौन्सिलमध्ये देखील नोंदणी केलेली असणे आवश्यक असून ही परीक्षा मे आणि नोव्हेंबर अशी दोनदा आयोजित केली जाते.
राज्य बार कौन्सिलमध्ये देखील नोंदणी केलेली असणे आवश्यक असून ही परीक्षा मे आणि नोव्हेंबर अशी दोनदा आयोजित केली जाते.
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, कायदा पदवीधरांना न्यायालयात प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली जाते.