Jagdish Patil
महिलांच्या हक्कांना, समानतेला आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो.
यानिमित्ताने जगभरातील महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकियदृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर दिला जातो.
तर जगभरात महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो? याबाबतची माहिती जाणून घेऊया.
या तारखेला अमेरिकन सोशलिस्ट पार्टीने पहिल्यांदा महिला दिन साजरा केला. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी हा दिवस साजरा केला जाऊ लागला.
1910 नंतर सोशलिस्ट इंटरनॅशनल कोपनहेगन परिषदेत त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. तेव्हा महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा मुख्य उद्देश होता.
1917 मध्ये रशियातील महिलांच्या ऐतिहासिक संपनंतर झारने सत्ता सोडली आणि महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
त्यावेळी रशियात ज्युलियन कॅलेंडर वापरलं जात होतं. मात्र, जगातील इतर देशांत ग्रेगोरियन कॅलेंडर पाळलं जायचं.
ज्युलियन कॅलेंडरात फेब्रुवारी 1917 चा शेवटचा रविवार 23 तारखेला तर ग्रेगोरियनमध्ये ही तारीख 8 मार्च होती. त्यामुळे जगभरात 8 मार्चला महिला दिन साजरा केला जाऊ लागला.
संयुक्त राष्ट्रांनी पहिल्यांदा 1975 महिला दिन साजरा केला. तर 1977 मध्ये UN च्या महासभेने 8 मार्च हा दिवस महिला हक्क दिन म्हणून घोषित केला.