सरकारनामा ब्यूरो
रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी त्यांच्या नव्या आणि हटके लुकमुळे सतत चर्चेत असतात. अशातच त्यांनी एका सन्मान पुरस्कार कार्यक्रमात नेसलेल्या साडीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
नीता यांना बोस्टनमध्ये एका विशेष कार्यक्रमात अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्याच्या गव्हर्नर मौरा हिली यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
बोस्टन येथील कार्यक्रमादरम्यान त्यांनी 'शिकारगाह' प्रकारची बनारसी साडी नेसली होती. ही साडी रेशमापासून बनवली जाते.
ही साडी खड्याचे विणकाम आणि पारंपारिक शिकार किंवा सापळ्यासारखे दिसणारे वेगवेगळे रंगीत धागे एकमेकांना जोडून ही डिझाइन तयार केले जाते.
साडीवर त्यांनी मल्टि-लेयर मोत्याचा हार आणि डायमंडची फिंगर रिंग घातली होती. त्यांचा या क्लासिक लुकमुळे त्या खूप आकर्षित दिसत होत्या.
बनारसी सिल्क साडीवर त्यांनी गुलाबी रंगाची शाल परिधान केली होती. यामुळे त्या आणखीच खुलून दिसत होत्या.
यापूर्वीही त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वॉशिंग्टन डीसी येथे डिनर पार्टीत एक खास साडी नेसली होती. त्याही साडीची प्रचंड चर्चा सोशल मीडियावर झाली होती.
ती पारंपारिक कांचीपुरम सिल्क साडी होती. त्यावर कांचीपुरमच्या भव्य मंदिरांच्या अध्यात्मिक आणि ऐतिहासिक सार दाखवणारे डिझाइन होते.