Deepak Kulkarni
आनंद दिघेंचे कट्टर शिष्य असलेल्या राजन विचारे ठाणे लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार आहेत.
ते 2014 आणि 2019 ला शिवसेनेच्या तिकीटावर ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
राजन विचारे हे आनंद दिघेंच्या सोबत नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे खासदार विचारे हेदेखील दिघे यांचे शिष्य मानले जातात.
शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्यात लढत होत आहे.
आजपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे निवडून यायचा. यामध्ये राजन विचारेंचं कर्तृत्व काय होतं? असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
‘धर्मवीर’ या चित्रपटात राजन विचारे यांच्याबाबत दाखवलेलं सर्व खोटं होतं, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
आनंद दिघेंनी सांगूनही विचारेंनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा दिला नव्हता.विचारे हे दिघेंचे नकली शिष्य आहेत. आता धर्मवीर २ या चित्रपटात सर्व खरं समोर येईल”, असंही शिंदे म्हणाले.
यावर राजन विचारे चांगलेच भडकले असून त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना कडक इशारा देतानाच मला तोंड उघडायला लावू नका असं म्हटलं आहे.
तुमची सर्व प्रकरणे माझ्याकडे आहेत. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.