Rashmi Mane
राज्यातील लोकप्रिय 'लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
यंदा दिवाळीपूर्वी या योजनेतून मिळणारा हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होऊ शकतो. कारण, शासनाने या योजनेत ई-केवायसी बंधनकारक केली आहे.
योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांना त्यांच्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी आपली KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
अविवाहित महिलांना आपल्या वडिलांची, तर विवाहित महिलांना आपल्या पतीची ई-केवायसी करावी लागणार आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतरच हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल.
ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो महिला या योजनेअंतर्गत लाभ मिळतो परंतु, अनेक लाभार्थिनींना अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांचा दिवाळीपूर्वीचा लाभ मिळण्यात उशीरा मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या वर्षी काही बहिणींना भाऊबीजच्या दिवशी हप्त्याची रक्कम मिळणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या बहिणींना दिवाळीपूर्वी लाभ मिळेल, तर काहींना त्यानंतर.
त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांचा दिवाळी हफ्ता वेळेत मिळू शकेल.
तशी अधिकृत घोषणा झाली नसली तरी या वर्षी काही बहिणींना भाऊबीजच्या दिवशी भावाकडून भेट मिळणार नाही, असा अंदाज आहे, मात्र, सर्व पात्र महिलांना त्यांचा लाभ निश्चितच मिळेल; फक्त थोडा विलंब होऊ शकतो.