Jagdish Patil
हिंदी महासागरात भारतीय नौदलाकडून 'मिलन 2026' या लष्करी सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे.
या सरावासाठी 70 हून जास्त देश सहभागी झाले असून हा सराव २५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
'मिलन 2026' हा बंगालच्या उपसागरापासून ते हिंदी महासागरापर्यंतचा सर्वात मोठा नौदल सराव आहे.
सरावाच्या सुरुवातीला, भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
मिलनची सुरुवात 1995 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटांवर झाली होती. आता तो इंडो-पॅसिफिकमधील एक प्रमुख सागरी व्यासपीठ बनलाय.
या सरावाचे उद्दिष्ट मित्र राष्ट्रांसोबत समन्वय वाढवणे, सामान्य सागरी आव्हानांना तोंड देणे हा आहे.
या सरावात भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक युद्धनौका आणि विमाने सहभागी झालेत.
या सरावात अमेरिका, रशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, युनायटेड किंग्डम आणि इराण सारखे देश सहभागी झालेत.
मतभेद असतानाही या देशांचे एकत्र येणे भारताची विश्वासार्ह सागरी भागीदारी आणि राजनैतिक दर्जा दाखवते.
पाकिस्तान, चीन वगळता जगातील प्रमुख नौदलांची उपस्थिती ही भारत हिंद महासागर क्षेत्रातील नेतृत्वाची भूमिका बजावत असल्याचा संदेश देत आहे.