Deepak Kulkarni
दरवर्षी पावसाळ्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबईची 'तुंबई' का होते? महापालिकेचं अब्जावधी रुपयांची आर्थिक तरतूद असूनही मुंबईकरांना मोठा मनस्ताप का सहन करावा लागत आहे. पाहा ५ मोठी कारणं...
पावसाळ्यात दरवर्षी हिंदमाता, सायन (गांधी मार्केट), अंधेरी (मिलन सबवे), कुर्ला आणि माटुंगा यांसारख्या सखल भागात हमखास पाणी तुंबल्याचं आपल्याला पाहायला मिळते.
६५ वर्षांत सत्ता बदलली, पण नशीब नाही!
गेल्या ६५ वर्षांत मुंबईवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी राज्य केले. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालि६५ वर्षांत सत्ता बदलली, पण नशीब नाही!
गेल्या ६५ वर्षांत मुंबईवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी राज्य केले. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालि
गेल्या ६५ वर्षांत मुंबईवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी राज्य केले. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असूनही, नियोजनशून्य विकास आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे हे सर्वपक्षीय 'कलेक्टिव्ह फेल्युअर' ठरले आहे.
मुंबईची भुयारी गटारे ही ब्रिटीशांनी निर्माण केली असून जी तासाला अवघा 25 मिमी पाऊस पचवू शकतात. मात्र, मागच्या 65 वर्षांत हवामान बदललं, पाऊस वाढला, पण प्रशासनानं या यंत्रणेची क्षमता वाढवण्याकडे दुर्लक्ष केलं आहे.
मुंबईचे अतिरिक्त पाणी समुद्रात नेणारी 'मिठी नदी' गेल्या ६ दशकांत बेकायदेशीर बांधकामांमुळे आक्रसत गेली. नदीचे रूपांतर नाल्यात झाले आणि २००५ च्या महापुरानंतरही प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतला नाही.
शहरात समुद्राचे पाणी येण्यापासून रोखणारी कांदळवने बिल्डरांच्या फायद्यासाठी उद्ध्वस्त करण्यात आली. संपूर्ण मुंबईत काँक्रिटीकरण झाल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरायला जागाच उरलेली नाही.
1995 च्या पूरानंतर ड्रेनेज क्षमता वाढवण्यासाठी 'ब्रिमस्टोवॅड' योजना आखली गेली. 40 वर्षे आणि हजारो कोटी रुपये वाहून गेले, तरी नोकरशाही व राजकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प आजही 100% पूर्ण झालेला नाही.
मुंबईत पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढली जातात. पण हा गाळ बहुतांश वेळा फक्त कागदावरच निघतो, ज्यामुळे पहिल्याच मुसळधार पावसात नाले ओसंडून वाहतात.