सरकारनामा ब्यूरो
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी एम्स रुग्णालयात निधन झाले.
केंद्र सरकारने देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, या 7 ही दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरण्यात येणार आहे.
देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला जातो. याचे नियम काय आहेत तुम्हला माहित आहेत का? चला तर मग जाणून घेऊयात...
भारतीय ध्वज संहितेतील कलम 11 नुसार देशातील उच्चपदारील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरण्यात येतो. कलम 11 मध्ये याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापैकी कोणाचेही निधन झाल्यास संपूर्ण देशात शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरण्यात येतो.
उच्चपदारील व्यक्तीच्या मृत्युची माहिती दुपारी मिळाली असेल तर, त्या दिवशी त्या व्यक्तीवर सुर्योदय होण्याआधी अंत्यसंस्कार केले नसतील तरच, देशात किंवा संबंधित राज्यांमध्ये दुसऱ्या दिवशी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतो.
जेव्हा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवायचा असेल तेव्हा तो प्रथम क्षणभर वरच्या टोकास फडकवावा आणि नंतरच अर्ध्यावर उतरवावा. तसेच त्या दिवशी तो पुन्हा एकदा वरच्या टोकास नेऊन नंतर खाली आणावा, असा नियम आहे.
राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणणे म्हणजे त्याचे वरचे टोक आणि दोरीचा आकडा यां दोन्हीमधील अंतराच्या निम्मपर्यत जेथे दोरीचा आकडा नसेल तेथे काठाच्या निम्म्यापर्यत तो उतरविणे होय.
भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे.