Aslam Shanedivan
टीम इंडियाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांचा आज विवाह होता. पण आता तो स्थगित करण्यात आला आहे.
स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना लग्नादिवशी तातडीने रूग्णालयात दाखल केलं. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यामुळे आता स्मृतीच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वडील श्रीनिवास मानधना यांच्याबद्दल थोडसे...
श्रीनिवास मानधना हे स्वतः एक प्रतिभावान क्रिकेटपटू होते. तरुणपणी त्यांनी सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते.
त्यांच्यात एक क्रिकेटसाठी लागणारे तंत्रज्ञान, शिस्त आणि खेळण्याची भूक होती. पण परिस्थिती आणि पालकांकडून पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांना आपला मार्ग पूर्ण करता आला नाही.
यामुळेच त्यांनी स्वतःच्या अपयशांना ताकदीत बदलत स्मृतीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनवण्याचा संकल्प केला. जो आता सत्यात उतरला आहे.
आज स्मृती मानधना जगातील सर्वोत्तम डावखुरी फलंदाज असून श्रीनिवास यांनी स्वतःसाठी पाहिलेले स्वप्न आज त्यांची मुलगी पूर्ण करत आहे.
सांगलीमध्येच स्मृतीचे वडील आपला व्यवसाय करत असून ते मानधनाच्या नावाने SM18 कॅफे चालवतात. येथूनच ते तरुणांना क्रिकेटपटू बनण्यासाठी प्रेरित करतात.