Jagdish Patil
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम 8 वर्षानंतरही सुरु न झाल्याने संभाजीराजे आक्रमक झालेत.
4 डिसेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्मारकाचं मुंबईत येऊन जलपूजन केलं होतं.
तर पंतप्रधानांनी जलपूजन केलेल्या ठिकाणाला संभाजीराजेंनी भेट देत, 'स्मारकाचे काम का रखडलं?' असा जाब सरकारला विचारला.
या शिवस्मारकाचं काम का रखडलं? याबाबतची माहिती जाणून घेऊया.
अरबी समुद्रात शिवरायांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकाच्या कामाचे आदेश ऑक्टोबर 2018 मध्ये देण्यात आले होते.
मात्र, जानेवारी 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कामाला स्थगिती दिली, ती आजही कायम आहे.
'एल अँड टी'ने प्राथमिक काम सुरू केल्यानंतर दोन महिन्यांतच पर्यावरणवादी, स्वयंसेवी संस्था आणि मच्छिमारांनी या प्रकल्पाला विरोध करणारी याचिका दाखल केली.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर जानेवारी 2019 मध्ये कामाला स्थगिती दिली. ती उठवण्याची मागणी राज्य सरकारने केली पण ती न्यायालयाने फेटाळली.
त्यामुळे जानेवारी 2019 पासून या प्रकल्पाबाबत पुढे काहीच झाले नाही. अजूनही प्रकल्पावरील स्थगिती कायम आहे.