Rashmi Mane
PM किसान योजनेचा 21 वा हप्ता लवकरच येणार आहे, पण काही शेतकरी याचा लाभ नाही. या यादीत तुमचं नाव तर नाही ना? जाणून घ्या कारणं.
तसं तर PM किसान योजनेचा हप्ता 4 महिन्यांच्या अंतराने येतो. 21वी हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. पण अधिकृत तारीख अद्याप जाहीर नाही. मात्र,...
ज्यांनी अद्याप आधार कार्ड लिंक केलेले नाही, त्यांची हप्ता अडकू शकते.
PM किसान योजनेत आधार लिंकिंग अनिवार्य आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीचे भू-सत्यापन आवश्यक आहे. ज्यांनी हे काम केलेले नाही, त्यांना 21वा हप्ता मिळणार नाही.
तसेच ई-केवायसी वेळेत न केल्यास हप्ता अडकू शकतो. हे काम तुम्ही pmkisan.gov.in किंवा जवळच्या CSC सेंटरवर करू शकता.
जे शेतकरी शासकीय कर्मचारी आहेत, करदाते आहेत किंवा त्यांच्या नावावर अयोग्य माहिती आहे, त्यांना हप्ता मिळणार नाही.
फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरली असल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. यामुळे हप्ता अडण्याची शक्यता वाढते.
pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासा. यादीत नसल्यास हप्ता येणार नाही.
आधार लिंकिंग, भू-सत्यापन, ई-केवायसी, माहिती अपडेट या गोष्टी वेळेत पूर्ण करा आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळवा!