Rashmi Mane
मृत्युपत्र म्हणजे आपल्या मृत्यूनंतर मालमत्तेची योग्य वाटणी कशी व्हावी, यासाठी केलेली लेखी व्यवस्था! वारसदारांमध्ये वाद टाळण्यासाठी उपयुक्त!
राज्यातील पहिलाच प्रयोग पुण्यात राबविण्यात आला आहे. नोंदणी विभागाचे कर्मचारी आता थेट तुमच्या घरी येणार, मार्गदर्शन करणार आणि मृत्युपत्र तयार करून देणार!
राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या अभियाना अंतर्गत ज्येष्ठांसाठी विशेष सेवा सुरू केली आहे. मृत्युपत्र बनवण्याचे पूर्ण मार्गदर्शन मोफत!
कोऱ्या कागदावर लिहिता येते. मुद्रांक शुल्क लागणार नाही. दोन साक्षीदारांच्या समक्ष स्वाक्षरी गरजेची, नोंदणी ऐच्छिक, पण फायदेशीर!
मृत्युपत्र करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असावी. डॉक्टरचे प्रमाणपत्र घेणे उत्तम. लाभार्थी साक्षीदार नसावेत.
जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क करा. वकील/प्रतिनिधीमार्फत अर्ज करा. ठरलेली तारीख व वेळ दिली जाईल. थोडेसे शुल्क आकारले जाते.
मृत्युपत्र तयार करताना संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ शूटिंगद्वारे टिपली जाते. यामुळे भविष्यात कोणताही वाद टाळता येतो!.
नोंदणी शुल्क फक्त 100 रूपये. नोंदणीकृत मृत्युपत्र सरकारी कामकाजात उपयोगी. लाभार्थी मृत्यूनंतर प्रमाणित प्रत मिळवू शकतात.