प्रसन्न जकाते
अकोला महापालिकेची स्थापना झाल्यापासून प्रशासकीय आणि पदाधिकाऱ्यांचे काम अपुऱ्या जागेतून सुरू आहे.
अकोला महापालिकेत असलेल्या दगडी इमारतीचा वापर अद्यापही सुरू आहे. मात्र ही इमारत आता जुनी झाली आहे.
अकोला महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारतही आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे नव्या इमारतीचा प्रस्ताव आहे.
अकोला महापालिकेसाठी नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. परंतु या जागेचे घोडे अडले आहेत.
अकोला महापालिकेला नव्या प्रशासकीय इमारतीची प्रतीक्षा आहे. नवी इमारत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होऊ शकते. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती गरजेची आहे.
महापालिकेतील सदस्यांना बसण्यासाठीही सध्या पुरेशी जागा नाही. ही जागा नव्या इमारतीत राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या जागेची निवड करण्यात आली होती. मात्र, ही जागा जिल्हा परिषदेच्या ताब्यात होती. आता ही जागा मनपाला मिळाली आहे.
जागा हस्तांतरीत झाल्यानंतर आता प्रत्यक्ष बांधकाम केव्हा सुरू होते याची प्रतीक्षा आहे.