Gajanan Kirtikar : गजानन किर्तीकरांची शिंदेंच्या शिवसेनेतूनही गच्छंती होणार का?

Mayur Ratnaparkhe

शिवेसेनेत फूट पडल्यानंतर उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर हे एकनाथ शिंदेसोबत गेले होते.

मात्र आता शिंदे गटात आपण एकाकी पडलो आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास ते सुरुवातीला इच्छुकही होते.

यामुळे या मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी दिली जाईल आणि ते खासदरकीची हटट्रिक करतील असं वाटत होतं.

परंतु याच मतदारसंघातून त्यांच्या मुलाला ठाकरे गटाने उमेदवारी देऊन मोठा डाव खेळला, परिणामी किर्तीकरांनी शेवटच्या क्षणी यु टर्न घेतला.

रविंद्र वायकरांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी दिली गेल्याने किर्तीकर नाराज झाले आहेत.

मतदानाच्या दिवशीच त्यांनी उघडपणे शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली.

परिणामी आता गजानन किर्तीकरांवर शिंदे गट काय कारवाई करणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

Next : गजानन किर्तीकरांवर कारवाईची मागणी करणाऱ्या शिशिर शिंदेंचा राजकीय प्रवास