सरकारनामा ब्यूरो
नागपूर येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (शुक्रवार) पाचवा दिवस आहे.
कुडकुडणाऱ्या थंडीत जॅकेट घालून मंत्री गिरीश महाजन विधानभवनात दाखल झाले.
मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी अजुनही खातेवाटप झाले नाही. त्यामुळे विधानभवनात खातेवाटपाबाबत आमदारांमध्ये चर्चा होती.
अधिवेशनात आमदार स्नेहा पंडीत आणि आमदार सना मलिक यांनी एकत्र एन्ट्री करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
मुंबई काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करणार असल्याचं जाहीर केलं.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता डिसेंबर महिन्यातच मिळणार आहे. राज्यातील एकही योजना बंद पडू देणार नाही असही फडणवीस यांनी सांगितलं.