Rajanand More
महाराष्ट्राचे सुपुत्र आयएएस स्वप्नील वानखडे हे मध्य प्रदेशात प्रशासन गाजवत आहेत. सध्या ते दातिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
जिल्हाधिकारी वानखडे यांच्याकडून जनसुनावणीदरम्यान अनेक गरजूंना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची नेहमीच धडपड असते. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नुकत्याच झालेल्या जनसुनावणीदरम्यान एका वायरमनची पत्नी आपल्या लहान मुलासह वानखडे यांच्यासमोर आली. त्यांनी रडत-रडतच आपले गाऱ्हाणे मांडले.
संबंधित महिलेच्या पतीवर रुग्णायलायात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. इतर सहकारी कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे त्यांना शॉक बसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आर्थिक परिस्थितीही बिकट असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी वानखडे यांनी तातडीने याची दखल घेत संबंधित वायरमनचा उपचाराचा सर्व खर्च मध्य प्रदेश वीज वितरण कंपनी करेल, असे सांगितले. तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही, असे ते म्हणाले.
ज्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये वायरमनला शॉक बसला, त्या सर्व घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी जागेवरून दिले.
वायरमनला पुन्हा नोकरी
उपचार सुरू असलेल्या वायरमनला नोकरीवरून काढून टाकले जाणार नाही, असेही वानखडे यांनी स्पष्ट केले. तसेच बरे झाल्यानंतर त्यांना शक्य होईल त्याच कामाची जबाबदारी दिली जाईल, असेही त्यांनी सांगतिले अन् महिलेला मोठा दिलासा दिला.
जिल्हाधिकाऱ्यांनी एका अनाथ मुलीसह तिच्या भावंडांच्या शिक्षणासाठी सर्व प्रकारची मदत करण्याबाबतचे आदेशही नुकतेच जनसुनावणीदरम्यान दिले होते. तेव्हा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.