Pradeep Pendhare
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव देशाच्या राजकारणात उतरणार असून, त्यांनी उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमधील करहल विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे.
समाजवादी देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. समाजवादी पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 37 जागा जिंकल्या आहेत.
अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशाच्या कन्नौज लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. अखिलेश यांनी 6 लाख 42 हजार 292 मतं घेत भाजपच्या सुब्रत पाठक यांना 1 लाख 70 हजार मतांनी हरवले.
अखिलेश यादव यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे वडील मुलायम सिंह यादव यांचे रेकाॅर्ड मोडलेत. सात मंत्री आणि दोन मंत्र्यांच्या मुलांचा पराभव केला.
अखिलेश यादव यांच्या राजकारणाला 2000 पासून सुरूवात झाली होती. कन्नौजमधून लागोपाठ तीन वेळा निवडून आले.
अखिलेश यादव 2012 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी तेथून राजीनामा देऊन पत्नी डिंपल यादव यांना राजकारणात एन्ट्री दिली.
अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने 2022 विधानसभा निवडणुकीत 11 तर, 2017 च्या निवडणुकीत 47 जागा जिंकल्या होत्या.
समाजवादी पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्या होत्या. आता अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली 2024 च्या निवडणुकीत 37 जागांवर विजय झाला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. निवडणुकांना वेळ असल्याने पक्षाचा विस्तारासाठी अखिलेश यादव यांनी राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेतली आहे.