Chetan Zadpe
नुकतंच सोशल मीडियावर एक लेटर व्हायरल झाले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
उत्तर प्रदेशातील एका महिला न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी मरणाची याचना केली होती.
पोस्टिंगच्यावेळी आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनामुळे आपल्याला असे पाऊल उचलायला लागते, असे महिला न्यायाधीशाने पत्रात लिहिले.
महिला न्यायाधीशाने एक जिल्हा न्यायाधीश आणि त्यांच्या अजून एका सहकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सरन्यायाधीशांनी याची गंभीर दखल घेतली असून, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे याबाबतचा अहवाल मागितला आहे.
खुद्द सरन्यायाधीशांनी यात लक्ष घातल्यामुळे आता या प्रकरणाचा पाठपुरावा होणार आहे.
मला आता जगायची इच्छा नाही. अशा घटनेमुळे माझ्या मनावर आघात झाले असून, आता माझ्या जगण्याचं ध्येय मला दिसत नाही, त्यामुळे मला मरणाची परवानगी द्यावी, असे पत्रात नमूद केले आहे.