Pradeep Pendhare
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 हजार रुपये मिळतात.
संजय गांधी निराधार अनुदान योजनद्वारे पात्र निराधार लाभार्थी महिलेला दरमहा 1500 रुपये मिळतात.
लेक लाडकी योजनेद्वारे मुलीच्या जन्मापासून शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर एकूण 1 लाख 1 हजार रुपयापर्यंत लाभ मिळतो.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेद्वारे पात्र मातांना मातृत्वासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.Women Government Schemes
प्रधानमंत्री मातृ वंदना पहिल्या अपत्यासाठी 5000 रुपये, तर तसेच दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6000 रुपये लाभाची तरतूद आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेद्वारे प्रसुती शासकीय रुग्णालयात अनिवार्य असून, यात मातृ अन् बाल सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.
सुकन्या समृद्धी योजना ही थेट अनुदान योजना नसून मुलीच्या नावाने बचत योजनेत जमा करण्यात येणाऱ्या रकमेवर सरकारकडून व्याज दिले जाते.
पात्र लाभार्थी महिला या सरकारी योजनांचा लाभ कागदपत्र जमा करून मिळवू शकतात.
सर्व 5 योजनांचे पैसे एका महिलेला मिळतातच, असे नाही. प्रत्येक योजनेची पात्रता, वय, उत्पन्न, कुटुंबाची स्थिती अन् इतर अटी वेगवेगळ्या आहेत.