महिलांनो, सुरू करा तुमचा लघुउद्योग! या आहेत सरकारच्या पाच योजना...

Rajanand More

महिलांच्या स्वप्नांना बळ

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. महिलांना स्वत:चा लघुउद्योग सुरू करता यावा, यासाठीच्या पाच योजनांची माहिती पाहूयात.

Women Schemes | Sarkarnama

स्वयंसिध्दी योजना

मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना लुघ व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

Women Schemes | Sarkarnama

सेस निधी

जिल्हा परिषद सेस निधीअंतर्गत महिला व बाल कल्याण समितीमार्फत शिलाई मशीन, पिठाची गिरणी, मसाला कांडण मशीनसाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

Women Schemes | sarkarnama

समृध्दी योजना

आर्थिकदृष्ट्या मागास व अल्पसंख्यांक प्रवर्गातील महिलांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

Women Schemes | Sarkarnama

मुद्रा योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महिला उद्योजकांसाठी विनातारण कर्जाची सुविधा. शिशु-किशोर-तरुण - या व्यवसायानुरूप तीन टप्प्यांमध्ये ५० हजार ते १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Women Schemes | sarkarnama

पर्यटन धोरण

आई-महिला केंद्रित पर्यटन धोरणांतर्गत पर्यटन क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी विशेष संधी. पर्यटनाशी संबंधित व्यवसायासाठी १५ लाखांपर्यंत व्याजरहित कर्जाची सुविधा.

Tourism | Sarkarnama

कागदपत्रे

योजनांसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला, बँक पासबूक आणि पासपोर्ट आकाराचे फोटो. तसेच व्यवसाय असल्यास त्याबाबतचा संक्षिप्त आराखडा.

Women Schemes | Sarkarnama

अर्ज कसा करायचा?

जिल्हा परिषद योजनांसाठी तुमच्या भागातील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत किंवा झेडपीच्या महिला व बाल कल्याण विभागात अर्ज मिळेल. कर्ज योजनांसाठी राष्ट्रीयीकृत बँका किंवा शासनाच्या अधिकृत महामंडळाच्या myscheme पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करता येतो.

Women Schemes | Sarkarnama

NEXT : सख्खे भाऊ मदत करेनात, जिद्दी मुलीनं थेट जिल्हाधिकाऱ्यांना बांधली राखी! काही तासांतच मिळालं मोठं गिफ्ट

येथे क्लिक करा.