Vijaykumar Dudhale
राज्यसभेच्या खासदार निर्मला सीतारमण यांच्यावर पुन्हा एकदा अर्थमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे
झारखंडमधून निवडून आलेल्या अन्नपूर्णा देवी यांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे महिला व बालकल्याण खाते सोपवण्यात आले आहे
अपना दल (सोनेलाल) पक्षाच्या अध्यक्ष अनुप्रिया पटेल या उत्तर प्रदेश मधील मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांना वाणिज्य राज्यमंत्री करण्यात आले आहे.
शोभा करंदलाजे या बंगळुरू उत्तर मतदारसंघातून निवडून आल्या असून त्यांची दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे, त्यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्रिपदाचा पदभार आहे.
जळगावमधील रावेरमधून तीन वेळा निवडून आलेल्या रक्षा खडसे यांना युवा व क्रीडा राज्यमंत्री करण्यात आले आहे
गुजरातमधून लोकसभा निवडून आलेल्या निमुबेन बाभंनिया अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री करण्यात आले आहे
मध्यप्रदेशमधील धार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आदिवासी नेत्या सावित्री ठाकूर यांना महिला व बालविकास खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये 2021 मध्ये महिला मंत्र्यांची संख्या 11 वर होती, ती महिला मंत्र्यांची सर्वाधिक संख्या समजली जाते.