सरकारनामा ब्यूरो
सीमा लाटकर या 2011 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत.
सीमा यांनी जवाहर नवोदय विद्यालय निवासी शाळेतून शिक्षण घेतले.
सीमा लाटकर यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पूर्ण केले.
सीमा या शिस्तप्रिय आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व असलेल्या अधिकाऱ्यांपैकी आहेत.
कर्तृत्ववान आणि बेधडक अधिकाऱ्यांमध्ये त्याचे नाव लोकप्रिय आहे.
बेंगळुरूमध्ये त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था, सहायक पोलिस महानिरीक्षक तसेच CID पदावर काम केले आहे.
आव्हानात्मक कामे स्विकारुन ती यशस्वीरित्या पार पाडणे ही त्यांची खास शैली आहे.
स्त्रिया, मुले आणि समाजातील वंचित घटकांशी संबंधित क्षेत्रात काम करणे त्यांची आवड आहे.
त्यांना फोटोग्राफी आणि सतार वाजवण्याची खूप आवड आहे.