Amol Sutar
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा - 2022 मध्ये पारुल चौधरी यांनी सुवर्णपदक मिळविले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकाने पारुल चौधरी यांना 4.50 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेसह पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) पदावर नियुक्तीचे पत्र दिले.
यूपीमध्ये खेळाडूंना प्रगती करण्यासाठी चांगल्या संधी आहेत. प्रोत्साहन रकमेसह डीएसपी पदासाठी नियुक्तीपत्र मिळाल्याने आनंद झाला असल्याचे पारुल चौधरी यांनी सांगितले.
योगी सरकारच्या प्रयत्नांमुळे मेरठ जिल्ह्यातील पारुल चौधरीचे बालपणीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.
लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत राज्यातील गुणवान खेळाडूंना पारितोषिक आणि नियुक्ती पत्रे देण्यात आली.
तुम्हाला सुवर्ण मिळाले तर तुम्ही थेट डीएसपीमध्ये रुजू व्हाल, असे युपीचे धोरण आहे, म्हणून मी सुवर्णपदक जिंकण्याचा निर्णय घेतला असल्याचे पारुल चौधरी हीने सांगितले.
पारुल चौधरीने आशियाई क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर शर्यतीत सुवर्ण आणि 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत यूपीच्या खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि नऊ कांस्यांसह एकूण 25 पदके जिंकली.