Sunil Balasaheb Dhumal
आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघातील गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झाले.
आरापूर येथील कार्यक्रमात कामगार विभागाअंतर्गत सुरक्षा कीटचे वाटपही करण्यात येणार होते.
हे कीट स्टेजच्या मागील बाजूस ठेवण्यात आले होते.
कार्यक्रम बराच लांबल्यामुळे महिला आणि कामगारांनी थेट जात कीटचे खोके घेऊन स्थळावरून पळ काढला.
फडणवीसांचे भाषण सुरू असतानाच कीट घेण्यासाठी कामगार आणि महिलांनी अक्षरशः धुडगूस घातला.
या गर्दीला आवरताना बंब यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
यापूर्वीही प्रशांत बंब यांच्याच कार्यक्रमात पत्र्याच्या पेट्यांसाठी अशाच उड्या पडल्या होत्या.