Mangesh Mahale
नवी दिल्ली येथील वर्ल्ड फूड इंडिया 2025 प्रदर्शन कृषी, अन्नप्रक्रिया उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले.
आंतरराष्ट्रीय मेळाव्यात जगभरातील उत्पादक, खरेदीदार, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्राच्या स्टॅालचे उद्धघाटन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र पॅव्हेलियनमधील द्राक्षे, संत्री, आंबा, केळी, डाळिंब यांसारख्या उत्पादनांनी परदेशी खरेदीदारांचे लक्ष वेधले.
भारताला जागतिक अन्नटोपली (ग्लोबल फूड बास्केट) म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने वर्ल्ड फूड इंडिया महत्त्वपूर्ण ठरले.
शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, उद्योगांना गुंतवणुकीचे नवे प्रवाह आणि कृषी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने हा मेळावा ऐतिहासिक ठरेल.
यात 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसह 21 कंपन्यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
वर्ल्ड फूड इंडिया हे महाराष्ट्र आणि भारतासाठी जागतिक संधींचे प्रवेशद्वार ठरले आहे.