Pradeep Pendhare
भारतात जगातील सर्वात जास्त शैक्षणिक संस्था असून, ज्या देशातील प्रचंड लोकसंख्येला शिक्षण देतात.
भारतात सुमारे 15 लाख शाळा आणि 12,700 हून अधिक उच्च शिक्षण संस्था आहेत.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार जगात सर्वाधिक माध्यमिक शाळा भारतात आहेत.
भारतातील माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 1,38,539 शैक्षणिक संस्था उपलब्ध आहेत.
भारतात उच्च शिक्षण संस्थामध्ये आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि आयआयएससी बंगळुरू सारख्या उच्चभ्रू संस्थांचा समावेश आहे.
भारतानंतर शाळा अन् महाविद्यालयांबाबत अमेरिका द्वितीय अन् चीन तृतीय क्रमांक लागतो.
अमेरिकेत सुमारे 5,819 उच्च शिक्षण संस्था असून, हार्वर्ड, एमआयटी, स्टॅनफोर्ड, प्रिन्सटन, येल, कोलंबिया सारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठांचा समावेश आहे.
चीनमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाची उच्च शिक्षण संस्था आहेत. यात 3117 विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शिक्षणाच्या इतर संस्था आहेत.